पावसाने धरणसाठ्यांत वाढ
By Admin | Updated: June 27, 2017 00:13 IST2017-06-27T00:12:53+5:302017-06-27T00:13:08+5:30
नाशिक : आर्द्रा नक्षत्राने जून महिन्याची सरासरी ओलांडतानाच धरणक्षेत्रात लागोपाठ दोन दिवस हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यांमध्ये जून महिन्यातच कमालीची वाढ झाली

पावसाने धरणसाठ्यांत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आर्द्रा नक्षत्राने जून महिन्याची सरासरी ओलांडतानाच धरणक्षेत्रात लागोपाठ दोन दिवस हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यांमध्ये जून महिन्यातच कमालीची वाढ झाली असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण साठ्यात तीन तर जिल्ह्यातील एकूण धरणांच्या साठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. अलीकडच्या काही वर्षांत पहिल्यांदाच जूनमध्ये धरणसाठ्यांत वाढ झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर मान्सून काहीसा लांबला होता, परंतु गेल्या आठवड्यात शुक्रवार व शनिवार अशा दोन्ही दिवशी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या दोन दिवसांत सुमारे ८०० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जून महिन्याच्या सरासरी २३२४ मिलिमीटरपैकी जूनच्या शेवटच्या आठवड्यात २७४१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे तर जूनच्या सरासरीच्या १८२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. वार्षिक टक्केवारीचा हिशेब केल्यास सोळा टक्के पाऊस जून महिन्यातच झाला आहे.
दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी खरिपाची पेरणी करण्यास सुरुवात केली असली तरी, पावसामुळे धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
बारा तासांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने त्र्यंबकेश्वर व इगतपुरीला झोडपून काढले त्याचा परिणाम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहाच्या साठ्यात तीन टक्के.
या पावसामुळे एकट्या गंगापूर धरणात दोन टक्के, कश्यपीमध्ये पाच टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा धरण समूहातही सरासरी तीन टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.