सलग तिसऱ्या दिवशी जिल्'ात अवकाळी पाऊस
By Admin | Updated: April 14, 2015 01:14 IST2015-04-14T01:14:25+5:302015-04-14T01:14:27+5:30
शहरालाही झोडपले, वृक्षांची पडझड

सलग तिसऱ्या दिवशी जिल्'ात अवकाळी पाऊस
नाशिक : जिल्'ात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजापुढील संकटे वाढली आहेत. सोमवारी (दि. १३) शहरातही दुपारनंतर पावसाने काही भागात जोरदार, तर काही भागात हलक्या स्वरूपात हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पंचवटीतील पेठरोडला भक्तिधामनजीक रस्त्यावर दोन्ही बाजूला वृक्षांच्या फांद्या उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतुकीची कोेंडी झाली होती. आधी पेठकडून नाशिकला येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडाची फांदी मोडली, तर थोड्याच वेळात भक्तिधामच्या बाजूने पांडे मिठाईसमोरील रस्त्यावर पुन्हा वृक्षाची मोठी फांदी रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र होते. येवला, नांदगाव व मालेगावनंतर अवकाळी पावसाने काल दिंडोरी, कळवणसह अन्य तालुक्यांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. रब्बीच्या गव्हालाही या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शहरातही काल दुपारनंतर अचानक वातावरण बदलून तीनच्या सुमारास हलक्या सरींनी हजेरी लावली. पंचवटीच्या काही भागात व जेलरोडला जोरदार पावसाने हजेरी लावली, तर शहराच्या काही भागात तुरळक स्वरूपात पावसाच्या सरी पडल्या. सायंकाळी पुन्हा काही भागात पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)