‘संवाद’च्या पाऊस कविता रंगल्या
By Admin | Updated: July 24, 2016 23:43 IST2016-07-24T23:38:33+5:302016-07-24T23:43:26+5:30
‘संवाद’च्या पाऊस कविता रंगल्या

‘संवाद’च्या पाऊस कविता रंगल्या
नाशिक :
‘पहिला पहिला पाऊस,
पहिली पहिली सर...
थेंब-थेंब वाचताना मोहरले अंग,
डोळ्यातून तरंगले हिरवे हे रंग...’
- अशा एकाहून एक पाऊस कवितांनी रसिकांना चिंब केले. निमित्त होते ‘संवाद’च्या वतीने आयोजित पाऊस कविता कार्यक्रमाचे. कुसुमाग्रज स्मारक येथे रविवारी हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘संवाद’चे माजी अध्यक्ष चंद्रकांत महामिने होते.
प्रारंंभी अलका कुलकर्णी यांनी ‘अंगणी आला गं पाऊस पाहुणा’ ही कविता सादर केली. यानंतर पवन बोरस्ते या नवकवीने ‘त्या धुंद पावसात’, संजय गोरडे यांनी ‘कोण म्हणतो पाऊस आभाळातून येतो’, आरती ढिंगोरे यांनी ‘त्यानं आता यायलाच हवं’ आणि ‘हळूच कवेत घ्यायला हवं’ ही कविता सादर केली. भीमराव कोते-पाटील यांनी ‘पहिला पहिला पाऊस’ ही पेश केली. काशीनाथ महाजन यांच्या ‘मृग सरी कोसळते माझिया दारात.. पावसाचे पत्र आले मातीच्या वासात’ या कवितेचे गायन करीत रसिकांची दाद घेतली. नीलेश देशमुख, दिव्या ढवळे, पांडुरंग कुलकर्णी, राधाकृष्ण साळुंके, रवींद्र दळवी, विद्या पाटील यांनीही कविता सादर केल्या. (प्रतिनिधी)