शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:26 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे.पिकांना पाण्याचा ताण पडत असल्याने पुर्व भागातील बळीराजा येथील येरे येरे पावसा म्हणत अर्जव करताना दिसतो आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वेळेआधीच वाटचाल सुरू झाली. दुष्काळी म्हणून गणल्या जाणाऱ्या सिन्नरच्या पूर्व भागात जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यानीदेखील वेग घेतला.शेतकऱ्यांना बांधावर खतांचे वाटपपाथरे : जामनदी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने पाथरे येथील शेतकरी सभासदांना थेट बांधावर युरिया खताचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र चिने, संचालक नारायण शिंदे, वारेगावचे सरपंच मिननाथ माळी यांचेसह शेतकरी सभासद उपस्थित होते. ना नफा ना तोटा या तत्वाने केवळ शेतकºयांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीने आज सर्वत्र युरिया खताची टंचाई निर्माण झाली असताना हा उपक्रम राबवला. ज्या सभासद शेतकºयांनी संस्थेकडे खताची मागणी नोंदविली होती त्या शेतकºयांच्या बांधावर रास्त किमतीत युरिया खत पोहोच करण्यात आले. गत चार वर्षांपासून शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवणाºया या संस्थेने डाळिंब, भाजीपाला, कांदा आदी शेतमालाची रास्त भावात खरेदी करून विक्री केली आहे. कंपनीमार्फत शेतकºयांना खात्रीशीर बियाणे, औषधे उपलब्ध करून दिली जातात. शेतकरी ते ग्राहक या तत्त्वाने संस्था कार्य करत असून वावी येथे शेतीसाठी आवश्यक असणाºया खते, बी - बियाणे, अवजारांचे विक्री केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र चिने यांनी दिली.---------------------कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर राहिल्याने पिकांसाठी अनुकूल परिस्थिती राहिली. मात्र, ऊन सावल्यांचा खेळात पिकांना पाण्याची गरज असल्याने आता येरे येरे पावसा मांडण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. अनेक भागात शेतकºयांनी पिकांना युरियाचा पहिला डोस दिला आहे. तर असंख्य शेतकºयांनी युरियाची खरेदी करून ठेवली आहे.-----------पाऊस नसल्याने खतांची ही मात्रा वापरतात येत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. सध्यस्थितीत पिकांना खतांची मात्रा मिळाली तर पुढच्या पावसात पिके बहरतील अशी आस आहे.---------------कारण पुढच्या काळात श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पूर्वभागात जेमतेम पडणाºया पावसावर पिकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पिके वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसला तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. अनेक भागात मका, सोयाबीन वर किडीचे अस्तित्व जाणवत आहे. पावसाची वाट बघावी लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक