वणी परिसरात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:40+5:302021-09-09T04:18:40+5:30

वणी : बुधवारी सकाळपासून वणी व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. सकाळपासून वणी परिसरात ...

Rain in Wani area | वणी परिसरात पाऊस

वणी परिसरात पाऊस

वणी : बुधवारी सकाळपासून वणी व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. सकाळपासून वणी परिसरात पावसाची जोरदार हजेरी लागली. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करत होते. मंगळवारी पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्यात तितकासा जोर नव्हता. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पावसामुळे सोयाबीन, तूर,उडीद ,मका ,भुईमुग या पिकांना जीवदान मिळाले असून विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. नद्या, नाले, ओहोळ यामधे पाण्याचा प्रवाह वाहत असून, ओझरखेड धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या पुणेगाव धरणात ७० टक्के पाणी क्षमतेइतके असल्याचा पाटबंधारे विभागाचा आहे. मांजरपाडा प्रकल्पातील पाणी पुणेगाव धरणात येत असल्याचा हा परिणाम आहे. पुणेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले तर त्यातील पाणी ओझरखेड धरणात सोडण्यात येते. ओझरखेड धरणातून वणी ,दिंडोरी ,चांदवड तालुक्यातील गावे व लखमापूर औद्योगिक क्षेत्र तसेच पाणीवापर संस्था यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वर्षभर पाणीपुरवठा होईल यासाठी सध्या पडत असलेला पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज व अपेक्षा आहे. दरम्यान, टॉमेटाे या पिकासाठी हा पाऊस काहीसा प्रतिकूल मानला जात असला तरी सध्यस्थितीत टमाट्याचे बाजारभाव पाहता काही अंशी नुकसान सहन करण्याची तयारी ठेवली तर भविष्यात दरवाढ होण्याचा अंदाज उत्पादकांचा आहे.

Web Title: Rain in Wani area