शहरात पावसाची झड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:42+5:302021-09-04T04:19:42+5:30
जुने नाशिक भागात धूरफवारणी नाशिक : शहरातील वाढत्या डेंग्यू आणि चिकुन गुन्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुने नाशिक परिसरात महापालिकेच्या ...

शहरात पावसाची झड
जुने नाशिक भागात धूरफवारणी
नाशिक : शहरातील वाढत्या डेंग्यू आणि चिकुन गुन्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुने नाशिक परिसरात महापालिकेच्या वतीने धूरफवारणी करण्यात आली. जुने नाशकातील अत्यंत छोट्या गल्ल्यांमध्येदेखील जाऊन मनपा कर्मचाऱ्यांनी मशीनने धूरफवारणी केल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पोळ्यासाठी बैलजोडीची विक्री
नाशिक : रविवार कारंजा, पंचवटी कारंजासह मेन रोडवर, पेठरोड, दिंडोरी रोडवर पोळ्यासाठी येणाऱ्या मातीच्या बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्यादेखील यंदा कमी झाली आहे. त्यामुळे यंदा छोटी जोडी २० रुपयांपासून तर मोठ्या जोडी ५० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. तर आकर्षक प्लास्टर ऑफ पॅरिसची बैलजोडी २०० रुपयांपासून पुढे विक्री होत आहे.
२५ सप्टेंबरच्या भारत बंदला डाव्या पक्षांचा पाठिंबा
नाशिक : केंद्राच्या शेतकरी विरोधी कृषी कायद्यांविरोधात गत १० महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखालील २५ सप्टेंबरच्या भारत बंद आंदोलनाला जिल्ह्यातील डाव्या पक्षांचा सक्रिय पाठिंबा राहणार आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी पक्ष आणि जनसंघटनांनी ताकद लावण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.