शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सरींचा वर्षाव अन‌् वातावरणात गारठा; आर्द्रतेचे प्रमाण थेट ९२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 19:09 IST

वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना दिनकराचे दर्शन होऊ शकलेले नाही.

ठळक मुद्देनाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभबळीराजावर दाटले चिंतेचे 'ढग'कमाल तापमानाचा पारा वेगाने घसरत आहे

नाशिक : लहरी निसर्गामुळे वातावरण बदलाचा कमालीचा अनुभव नाशिककरांना मागील चार दिवसांपासून येत आहे. शनिवारी संध्याकाळी रिमझिम सरींचा बेमोसमी वर्षाव झाला. रविवारी (दि. १३) पुन्हा सकाळ-संध्याकाळ मध्यम सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ हवामान कायम राहिल्याने नाशिककरांना रविवारीसुद्धा सूर्यदर्शन घडले नाही. या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानाचा पारा १७ अंशावर असला तरी कमाल तापमानाचा पारा वेगाने घसरत असून वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. आर्द्रतेचे प्रमाण रविवारी सकाळी ९२ टक्के इतके नोंदविले गेले.अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा यामुळे चक्रवात क्षेत्राची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.दक्षिण पूर्व-अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. मागील चार दिवसांपासून शहराच्या हवामानात मोठा बदल नाशिककरांना अनुभवायला येत अहे.

रविवारी पहाटेच्या सुमारास दृश्यमानतादेखील कमी झाली होती. मध्यम सरींचा रिमझिम वर्षाव, दाटलेले धुके आणि सुटलेला थंड वारा असे काहीसे वातावरण अनुभवायला आले. यामुळे रविवारची सुटी असूनही शहरामधील जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून आली नाही. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना दिनकराचे दर्शन होऊ शकलेले नाही.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमानRainपाऊस