पावसाने द्राक्षे पंढरी हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:53 PM2020-09-25T21:53:41+5:302020-09-26T00:40:09+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे हंगाम यंदा उशीर सुरू होण्याची चिञ निर्माण झाले आहे . कारण हवामानातील बदल . व परतीचा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाची व्दिधा अवस्था निर्माण झाली असल्याने यंदा हंगाम उशीरा चालू होण्याची माहिती शेतकरी वर्गाकडुन मिळत आहे.

The rain shook the grapes | पावसाने द्राक्षे पंढरी हादरली

पावसाने द्राक्षे पंढरी हादरली

Next
ठळक मुद्देदिंडोरी : तालुक्यातील द्राक्षे हंगाम यंदा उशीरा सुरू होणार

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे हंगाम यंदा उशीर सुरू होण्याची चिञ निर्माण झाले आहे . कारण हवामानातील बदल . व परतीचा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाची व्दिधा अवस्था निर्माण झाली असल्याने यंदा हंगाम उशीरा चालू होण्याची माहिती शेतकरी वर्गाकडुन मिळत आहे.
जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्याला ग्रीन झोन ,व द्राक्षे पंढरी म्हणून नाम उल्लेख केला जातो. परंतु मागील वर्षी व गती वर्षी या द्राक्षे पंढरी तील बळीराजां अनेक संकटानी व समस्यानी ग्रासल्याने यंदा दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष्याची गोड चव नागरिकांना उशीर मिळेल असे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. मागील वर्षी अव्वाच्या सव्वा पाऊस पडल्याने द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला द्राक्षे हंगाम घेताना मोठी तारेवरची कसरत करावी लागली होती. थेट छाटणी पासून ते द्राक्षे माल विकणे पर्यंत शेतकरी वर्गाचे नाके नऊ आले.त्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करून द्राक्षे बागा उभ्या केल्या, परंतु कोरोना मुळे द्राक्षे कवडी मोल भावाने विकावे लागले.त्यात भांडवल प्रमाणापेक्षा जास्त व उत्पन्न काही च नाही. त्यामुळे मागील हंगामात शेतकरी वर्ग पुर्णपणे हतबल होऊन गेल्याने यंदा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा. ही मोठी समस्या निर्माण झाल्याने आता पुढे काय? असे संकट आ वासून उभे राहिले आहे.
यंदा कोरोना व हवामानाचा बदलाव,निसर्गाची अवकृपा ,तसेच पावसांचा मनमानी पणा व अपुरे भांडवल यामुळे शेतकरी वर्गाला यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा अशी व्दिधा अवस्था निर्माण झाल्याने यंदा दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे हंगाम उशीरा चालू होईल अशी चिञे सध्या तालुक्यात दिसत आहे.

 

Web Title: The rain shook the grapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.