शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत वादळी वाऱ्यासह पावसाची सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:56 IST

पंचवटी : परिसरात रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार सलामी दिली. येथील दिंडोरी रोडवरील श्रीरामनगरात रस्त्याच्या कडेला असलेले गुलमोहराचे मोठे झाड उन्मळून पडल्याने उद्यानाच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या काही मोटारींचे नुकसान झाले.

ठळक मुद्देगुलमोहराचे झाड कोसळले : श्रीरामनगरमध्ये मोटारींचे नुकसान

पंचवटी : परिसरात रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार सलामी दिली. येथील दिंडोरी रोडवरील श्रीरामनगरात रस्त्याच्या कडेला असलेले गुलमोहराचे मोठे झाड उन्मळून पडल्याने उद्यानाच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या काही मोटारींचे नुकसान झाले.दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी सिनेमाच्या पाठीमागे श्रीरामनगर ही लोकवस्ती आहे. येथील एका उद्यानालगत सुमारे आठ ते दहा वर्षे जुने गुलमोहराचे मोठे झाड पाऊस व वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाडाची फांदी सॅन्ट्रो कारवर (एमएच ०४ डीजे ३७९४) पडल्याने गाडीच्या काचा फुटून मागचा भाग चेपला गेला. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या कटरने कापून कोसळलेल्या झाडाचा अडथळा दूर केला. वृक्ष रस्त्यावर पडल्याने काहीकाळ मुख्य कॉलनी रस्त्यावरची वाहतूक बंद झाली होती.पावसामुळे परिसरातील रस्ते ओलेचिंब झाले होते, तर रस्त्यावर पाणी साचल्याने काहीकाळ रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.सायंकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी किरकोळ कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना झाडाच्या तसेच इमारतीचा आश्रय घ्यावा लागला.. सुमारे अर्धा तास धुवाधार पावसाने पंचवटी परिसराला झोडपले.फोटो आर वर ३०पंचवटी व ३०कार नावाने

टॅग्स :RainपाऊसAccidentअपघात