खरिपाच्या पिकांना पावसाने दिलासा

By Admin | Updated: August 8, 2016 23:09 IST2016-08-08T23:09:14+5:302016-08-08T23:09:35+5:30

खरिपाच्या पिकांना पावसाने दिलासा

Rain relief from kharif crops | खरिपाच्या पिकांना पावसाने दिलासा

खरिपाच्या पिकांना पावसाने दिलासा

पिंपळगाव वाखारी : परिसरात पुष्य नक्षत्राच्या अंतिम टप्प्यात पावसाने दिलासा देऊन पिकांना जीवदान दिल्याने शेतकरी सुखावला आहे. पुष्य नक्षत्रातील रिमझिम पावसाने काही प्रमाणात परिसरातील चाराटंचाई दूर करण्यास उपयोगी येणार आहे. परिसरासह देवळा तालुक्याच्या पूर्वभागात समाधानकारक पाऊस नाही; परंतु दर्श अमावास्येच्या निमित्ताने पुष्य नक्षत्राच्या अंतिम-चरणात हलक्या स्वरूपाचा पाऊस चांगला झाल्याने दिलासा मिळाला. या पावसामुळे काही प्रमाणात शेळ्या, मेंढ्यांसह इतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Rain relief from kharif crops