इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:52+5:302021-06-05T04:11:52+5:30

मुंबईच्या घाटकोपर आणि गोरेगाव येथील राहणारे सचिन भांगजीभाई सावला (वय ४०), जगदिप मालसीभाई सतरा (४०) , सागर रायचंद सतरा ...

Rain Forest Resort Seal at Igatpuri | इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट सील

इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट सील

मुंबईच्या घाटकोपर आणि गोरेगाव येथील राहणारे सचिन भांगजीभाई सावला (वय ४०), जगदिप मालसीभाई सतरा (४०) , सागर रायचंद सतरा (३९), राजू खिमजी सतरा (४०), शेफाली राजू सतरा (४८), डिम्पल जगदीप सतरा(३९), त्रिशला सागर सतरा (३८), मीना मनसुख सतरा (४०), पायल सचिन सावला (४१),मनसुर विरम सतरा (४०) जा १० जणांनी जिल्हाबंदी असताना नाशिक जिल्ह्यात प्रवेश केला. ई-पास न काढता त्यांनी इगतपुरी जवळील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये वास्तव्य केले. जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे पालन न करता कोरोना आजाराचे संसर्ग स्व:तला अगर समाजात पसरविण्याचा संभव आहे हे माहीत असताना त्यांनी ही कृती केली. दहाही जणांनी अत्यावश्यक काम नसताना, ई-पास न घेता जिल्हाबंदीच्या आदेशाचा भंग केला. नाशिक जिल्ह्यात प्रवेश करून रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे येऊन वास्तव्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल वैभव एकनाथ वाणी यांनी फिर्याद दाखल केली आहे. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

इन्फो

जिल्हाबंदी आदेशाचा भंग

जिल्हाबंदीचा आदेश असताना ई-पास न काढता नाशिक जिल्ह्यात प्रवेश केला. विनापरवाना प्रवेश करून रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये वास्तव्य केल्याचे निदर्शनास आल्याने वास्तव्य करणाऱ्या १० जणांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १० आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग, स्वतःसह इतरांना संसर्ग पसरण्यासाठी कारणीभूत ठरल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Rain Forest Resort Seal at Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.