परतीच्या पावसाची दांडी; खरीप पिकांना फटका
By Admin | Updated: October 6, 2014 23:20 IST2014-10-06T23:18:49+5:302014-10-06T23:20:03+5:30
परतीच्या पावसाची दांडी; खरीप पिकांना फटका

परतीच्या पावसाची दांडी; खरीप पिकांना फटका
ब्राह्मणगाव : परतीच्या पावसाने परिसरात दांडी मारल्याने खरिपाच्या अंतिम टप्प्यातील पिकांना त्याचा फटका बसला असून, मका पिकाची, कणसांची वाढ खुंटली आहे. मका उत्पादन घटण्याची शक्यता आहे. विहिरींच्या पाण्याची पातळीही
घटू लागली असून, आॅक्टोबर ‘हीट’ वाढल्याने त्याचाही परिणाम पिकांवर होऊ लागला आहे. परिसरात तसा सरासरीपेक्षा
कमीच पाऊस झाला आहे. आधीच पावसाने उशिरा हजेरी लावून खरीप लागवड लावली होती. थोड्याफार पावसावर घेतलेली खरिपाची पिके परतीच्या पावसावर येतील, अशी आशा असताना परतीचा पाऊस आलाच नाही. त्यामुळे खरीप लागवड व विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने कमी पावसामुळे हा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे.