मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST2021-07-26T04:13:28+5:302021-07-26T04:13:28+5:30

तालुक्यातील माळमाथा भागात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अत्यल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या, परंतु जोरदार ...

Rain drizzle in the area including Malegaon | मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप

मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप

तालुक्यातील माळमाथा भागात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अत्यल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या, परंतु जोरदार पाऊस नसल्याने, त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. काही शेतकऱ्यांनी उशिरा खरिपाची पेरणी केली, अशा शेतकऱ्यांच्या पिकांना रिपरिप पावसाने जीवदान मिळाले असून, मुसळधार पाऊस न झाल्याने, शेतकऱ्यांच्या विहिरींना पुरेसे पाणी नाही. नद्या-नाले तुडुंब भरून वाहिले, तर विहिरींना पाणी येईल. दरम्यान, परिसरातील शेतकरी खरिपाच्या कामात व्यस्त झाला असून, शहरात बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. काही शेतकरी काढलेला कांदा चाळीत साठवत असून, कांदा पावसाने भिजून नुकसान होऊ नये, म्हणून प्लास्टीक कागद खरेदी करताना दिसत आहेत.

तालुक्यातील बंधारेही कोरडे असून, काही गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. शहर परिसरातील शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील रस्ते उद्ध्वस्त झाले असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात साठून चिखल झाला आहे. त्यात निसटून अपघात होत आहेत, तर नववसाहतींमध्ये रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.

Web Title: Rain drizzle in the area including Malegaon