शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाऊस;  वीज पडून दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:11 IST

नाशिक : पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांवर वरुणराजाची कृपादृष्टी बुधवारी (दि. २०) दुपारी झाली. अवघ्या दीड तासात २६ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान केंद्राने केली आहे. जिल्ह्यातही विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यात वीज पडून सिन्नर तालुक्यातील मिठसागरे तसेच हिवरगाव येथे प्रत्येकी एक युवक ठार झाला ...

नाशिक : पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांवर वरुणराजाची कृपादृष्टी बुधवारी (दि. २०) दुपारी झाली. अवघ्या दीड तासात २६ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान केंद्राने केली आहे. जिल्ह्यातही विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यात वीज पडून सिन्नर तालुक्यातील मिठसागरे तसेच हिवरगाव येथे प्रत्येकी एक युवक ठार झाला आहे. तसेच दोन गायीही मरण पावल्या आहेत. मिठसागरे येथे वीज पडून ३० वर्षीय युवक ठार झाला तर देवपूर येथे झाडाखाली बांधलेल्या गायींवर वीज पडून दोन गायी ठार झाल्याची घटना घडली.  वरुणराजा जणू नाशिककरांवर रुसला की काय अशी शंका घेतली जात होती; कारण ७ जूनच्या मध्यरात्री झालेल्या पावसानंतर मात्र पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजासह सर्वच धास्तावले होते. शहरासह जिल्ह्णात पाऊस लांबल्याने चिंता व्यक्त केली जात होती. बुधवारी दुपारी दीड तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दिलासा जरी मिळाला असला तरी सलगपणे पाऊस व्हावा, अशीच अपेक्षा नागरिक करीत आहेत. दरम्यान मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मिठसागरे येथे वीज पडून प्रवीण गणपत कासार (३०) या युवकाचा मृत्यू झाला. देवपूर शिवारात देवपूर-मिठसागरे रस्त्यावर डांबरनाला परिसरात रणजीत दशरथ गडाख यांच्या वस्तीवरही वीज पडली. गडाख यांनी त्यांच्या गायी झाडाखाली बांधलेल्या दोन गायी ठार झाल्या.उत्तर महाराष्टÑासह जिल्ह्णात मान्सूनच्या प्रवेशाला विलंब झाला. मान्सूनचे ढग अरबी समुद्रापासून पुढे सरकण्यास पोषक असे वातावरण तयार झालेले नसल्यामुळे पावसाची प्रतीक्षा करावी लागत होती. वाऱ्याचा वेगही शहरात प्रचंड प्रमाणात वाढल्याचा अनुभव आठवडाभरापूर्वी नाशिककरांना आला. वेगाने वाहणाºया वाºयामुळे पाऊस अधिक लांबण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. बुधवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. तत्पूर्वी पावणेतीन वाजेपासून थंड वारा सुटला होता आणि शहरावर ढग दाटून आले होते. दुपारी सुरू झालेला पाऊस साधारणत: साडेचार वाजेपर्यंत शहरात कायम होता. साडेचार वाजेनंतर पावसाचा जोर कमी झाला. या दीड तासात २६ मि.मी. इतका पाऊस शहरात पडला. हंगामातील हा पावसाचा उच्चांक राहिला असून, आतापर्यंत ६९ मि.मी. इतका पाऊस शहरात या वीस दिवसांमध्ये झाला आहे.१७ झाडे कोसळलीदीड तास झालेला जोरदार पाऊस आणि सुटलेला सोसाट्याच्या वाºयामुळे शहर व उपनगरांमध्ये एकूण १७ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची नोंद अग्निशामक मुख्यालयाने केली आहे. दुपारी साडेतीन वाजेपासून अग्निशामक मुख्यालयाचे दूरध्वनी खणखणू लागले. शहरातील शरणपूररोड, कॉलेजरोड, गंगापूररोड, टाकळीरोड, पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर आदी भागांमधून झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्याने नागरिकांकडून मदत मागण्यात आली. मुख्यालयाच्या दोन बंबांसह पंचवटी, नाशिकरोड, सिडको या उपकेंद्रांचे बंबही रस्त्यावर धावत होते. जवानांनी भर पावसात ठिकठिकाणी पडलेली झाडे हटवून मार्ग मोकळा केला. या हंगामात आतापर्यंत ३५ झाडे कोसळली आहेत.

टॅग्स :Rainपाऊस