शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
4
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
5
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
6
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
7
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
8
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
9
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
10
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
11
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
12
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
13
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
14
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
15
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
16
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
17
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
18
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
19
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
20
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे प्रचारात व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 02:15 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. अचानक आलेल्या पावसामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली

ठळक मुद्देप्रचार थंडावला , सकाळच्या सत्रात प्रचार फेऱ्या उमेदवारांची झाली धावपळ

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. अचानक आलेल्या पावसामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली तर अनेकांनी सुरक्षित आसरा घेतला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे अखेर प्रचार रॅली स्थगित करून मतदारांशी व्यक्तिगत भेटीगाठी व भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला.गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची पायपीट शनिवारी सायंकाळी ५ वाजता थांबली. तत्पूर्वी उमेदवारी दाखल केल्यानंतर मतदार संघ पिंजून काढण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्वच राज्यस्तरीय नेत्यांनी नाशिक शहर व जिल्ह्यात हजेरी लावून जाहीरसभा घेतल्या. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरण ढवळून निघाले होते.शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार असल्याचे पाहून आदल्या दिवसांपासूनच उमेदवारांनी शनिवारी सकाळी शक्तिप्रदर्शन करीत प्रचार रॅली काढण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काही उमेदवारांनी सकाळी १० वाजता आपापल्या संपर्क कार्यालयापासून प्रचार रॅली काढली. काही उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन केले तर काहींनी ध्वनिक्षेपकाचा वापर केला. प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली जात असतानाच, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही वेळातच पावसाने जोर धरल्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने प्रचार दुपारनंतर संपुष्टात आणावा लागला.१९५० हेल्पलाइन नंबरनिवडणुकीसंदर्भात कोणतीही माहिती आणि गैरसोय विषयी जाणून घेण्यासाठी मतदारांना १९५० हा हेल्पलाइन नंबर देण्यात आलेला आहे. या सुविधेचा लाभ १२ हजारांपेक्षा अधिक मतदारांनी घेतलेला आहे. आलेल्या सर्व कॉल्सचे निराकरण करण्यात आलेले असून, कोणतीही तक्रार पडून नाही, असा दावा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी केला आहे.तक्रारीसाठी सीव्हीजल अ‍ॅपउमेदवार तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी सी-व्हीजील अ‍ॅप असून, त्या अंतर्गत आत्तापर्यंत नऊ तक्रारी आलेल्या असून, या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांना या अ‍ॅपवर तक्रारीची माहिती नोंदवू शकणार आहेत. मोबाइलवर अ‍ॅप डाउन लोड करून त्यावर पुराव्यासाठी छायाचित्रदेखील टाकले जाऊ शकते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकRainपाऊस