पाऊस गायब झाला.
By Admin | Updated: October 6, 2014 23:43 IST2014-10-06T23:34:15+5:302014-10-06T23:43:44+5:30
पाऊस गायब झाला.

पाऊस गायब झाला.
साकोरा : यावर्षी आॅगस्टच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिके हाती येतील, अशी परिसरातील शेतकऱ्यांना आशा होती. मात्र पिके ऐन दाणा भरण्याच्या प्रक्रियेत असतानाच पाऊस गायब झाला. आता मात्र सर्वत्र पाणी उपलब्ध असतानादेखील वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. मात्र, निवडणूक व ऐन सणासुदीच्या धामधुमीत लोकप्रतिनिधी गुंतल्याने शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.येथील गव्हाळी शिवारातील २०० केव्हीचा ट्रान्स्फॉर्मर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सदर ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी अनेक शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही वीज मंडळाने लक्ष न घातल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.