तरसाळी : बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी विविध गावांमधील समस्या जाणून घेण्यासाठी ‘आमदार आपल्या गावी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवारी (दि.१०) विरगांव गटातील तरसाळी, औंदाणे, वनोली या गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांनी समस्या कथन करतानाच आमदारांच्या पुढयात मागण्यांचा पाऊस पाडला. दरम्यान, कुठल्याही लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असतांना मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता गावातील हेवेदावे गावातच ठेवुन सकारात्मक विचार सारणीने काम केल्यास लोककल्याणकारी योजना गावात योग्य प्रकारे राबवून गावाचा विकास उत्कृष्ट पद्धतीने करता येतो., असे प्रतिपादन दिलिप बोरसे यांनी तरसाळी येथे बोलताना केले.दिलीप बोरसे यांना तरसाळी येथील एकलव्य आदिवासी मित्र मंडळाच्या वितने गावात मंगलकार्यालय उभारण्यात यावे., खावटी मिळावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. तर सुधाकर पाटील यांनी केळझर चारी क्र मांक आठचे काम लवकर पूर्ण करून ते पाणी सुकडनाल्यात टाकण्यात यावे. हत्ती नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात यावा तसेच डांगसौंदाणे कडे जाण्यासाठीचा रस्ता तयार करण्यात यावा अशा मागण्या केल्या. बोरसे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात चालु असलेल्या सप्ताहस भेट दिली. आमदार बोरसे यांनी कुठल्याही गटातटाचे राजकारण न करता ग्रामस्थांंच्या मागणीनुसार सर्व विकासकामे पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.बोरसे यांचा सत्कार तरसाळीच्या सरपंच मिनाबाई पवार यांनी केला. यावेळी उपसरपंच सुमनबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक गांंगुर्डे, वैशाली मोहन, कमल गांंगुर्डे, दिपक रौंंदळ, दला पिंंपळसे, ग्रामसेवक एन.एम.देवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राकेश रौंंदळ, उपाध्यक्ष पुंंडलिक रौंंदळ, सुधाकर पाटील,प्रभाकर पवार, भिका रौंंदळ आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारांच्या पुढयात मागण्यांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:32 IST
विरगाव गट : दिलीप बोरसे यांना निवेदने सादर
आमदारांच्या पुढयात मागण्यांचा पाऊस
ठळक मुद्देतरसाळी येथील एकलव्य आदिवासी मित्र मंडळाच्या वितने गावात मंगलकार्यालय उभारण्यात यावे., खावटी मिळावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.