शहरात पावसाची हजेरी
By Admin | Updated: July 24, 2016 00:44 IST2016-07-23T23:55:42+5:302016-07-24T00:44:00+5:30
शहरात पावसाची हजेरी

शहरात पावसाची हजेरी
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.२३) दुपारनंतर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. दुपारनंतर शहरात काही वेळ संततधार कायम होती.
गुरुपौर्णिमेला दिवसभर पावसाने शहरासह ग्रामीण भागात हजेरी लावली होती. त्यानंतर दोन दिवस उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी संकष्टी चतुर्थीला हजेरी लावली. शनिवारी दुपारनंतर झालेल्या रिमझिम पावसामुळे प्रमुख रस्त्यावर काहीसा चिखल झाल्याचे चित्र होते. तसेच दुपारपर्यंत लख्ख सूर्यप्रकाश असल्याने रेनकोट न आणणाऱ्या चाकरमान्यांची व नाशिककरांची चांगलीच धावपळ उडाली होती. पावसाने मधल्या काळात उघडीप घेतल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येऊन पेरण्यांची टक्केवारी ७० टक्केपर्यंत पोहोचली आहे. आणखी काही दिवस पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावल्यास पेरणीला वेग येणार आहे. (प्रतिनिधी)