शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
3
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
4
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
5
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
6
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
7
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
8
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
9
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
10
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
11
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
12
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
13
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
14
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
15
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
16
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
17
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
19
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
20
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय

पाऊस बरसला, दुष्काळी मदतीची अद्यापही प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:00 IST

जिल्ह्णातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने जिल्ह्णातील १७ महसुली मंडळातील ३०८ गावांसाठी ७५ कोटींच्या निधीची घोषणा केली होती तशी तरतूदही मदत निधीमध्ये करण्यात आली होती; मात्र कठोर दुष्काळानंतर पावसाची सरी बरसल्या तरीही या गावांमध्ये दुष्काळी मदत पोहोचलीच नसल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, ७५ कोटींचा मदतनिधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव दिला असल्याचे समजते.

ठळक मुद्दे३०८ गावे वंचित : ७५ कोटींची मदत पोहोचेना; प्रशासनाकडून प्रस्ताव

नाशिक : जिल्ह्णातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने जिल्ह्णातील १७ महसुली मंडळातील ३०८ गावांसाठी ७५ कोटींच्या निधीची घोषणा केली होती तशी तरतूदही मदत निधीमध्ये करण्यात आली होती; मात्र कठोर दुष्काळानंतर पावसाची सरी बरसल्या तरीही या गावांमध्ये दुष्काळी मदत पोहोचलीच नसल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, ७५ कोटींचा मदतनिधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव दिला असल्याचे समजते.राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून त्यासाठी मदतीची घोषणा केली होती. या दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिकच्या काही तालुक्यांचादेखील समावेश होता. जिल्हयातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केल्यानंतर या तालुक्यांना मदत निधी म्हणून शासनाने २८७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. या मदतीनंतर जिल्ह्णातील अनेक तालुक्यांमधील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहून या तालुक्यांमध्येदेखील दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढली होती. याबाबत अनेकांनी शासनाच्या निदर्शनास दुष्काळाची भीषणता मांडली होती. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादरही करण्यात आले होते.या मागणीची दखल घेत शासनाने कळवण, दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यांतील १७ महसुली मंडळात दुष्काळ जाहीर केला. त्यामध्ये कळवण तालुक्यातील कळवण, नवीबेज, मोकभांगी या गावांचा समावेश होता, तर दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, मोहाडी, वरखेडा या मंडळांमध्ये दुष्काळ होता. निफाड तालुक्यातील निफाड, रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूरमधमेश्वर या सहा मंडळांत दुष्काळ जाहीर केला होता. तर येवला तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, पाटोदा, सावरगाव, जळगाव नेऊर या मंडळाचा समावेश होता. या १७ महसुली मंडळांमध्ये दुष्काळाने पीडित ३०८ गावांचा समावेश आहे.पूर्वीच्या गावांना मिळालेली मदत आपल्यापर्यंतही पोहोचेल या आशेने संपूर्ण दुष्काळाचा काळ शेतकºयांनी प्रतीक्षेवर काढला. शेतकºयांना मदत म्हणून शासनाकडून ७५ कोटींचा निधी दिला जाणार होता. त्यामुळे दुष्काळग्रस्तांचे या मदतीकडे लक्ष लागून होते.मात्र, आता पावसाळा उजांडला तरी ही मदत शासनाकडून अद्यापही प्राप्त झालेली नाही. दुष्काळग्रस्तांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनदेखील प्रयत्न केले जात असून, तसा प्रस्ताव त्यांनी शासनदरबारी धाडला आहे. आता प्रत्यक्षात मदत शेतकºयांना मिळण्याची प्रतीक्षा आहे.—इन्फो—-दफ्तर दिरंगाईचा फटकादुष्काळ निवारणासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या उर्वरित निधीची प्रतीक्षा गेल्या चार महिन्यांपासून आहे. शासनाने निधीची तरतूद केली असली तरी दुसºया टप्प्यातील निधी वितरणास दप्तर दिरंगाई कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या दिरंगाईमुळे राज्यातील अनेक शेतकरी अजूनही दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत. जिल्हा प्रशासनाने मागणी नोंदविली असली तरी प्रत्यक्षात निधी हातात कधी पडतो आणि वितरण कधी होते याची प्रतीक्षा असणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकारMONEYपैसा