शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मालवाहतुकीत रेल्वेचा विक्रम; चार कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST

नाशिक रोड : येथील रेल्वे मालधक्क्यावरून जुलैच्या एका महिन्यात देशातील विविध राज्यांत रेल्वेच्या २९ एनएमजी रेकद्वारे तब्बल २९०० चारचाकी ...

नाशिक रोड : येथील रेल्वे मालधक्क्यावरून जुलैच्या एका महिन्यात देशातील विविध राज्यांत रेल्वेच्या २९ एनएमजी रेकद्वारे तब्बल २९०० चारचाकी गाड्या पाठवून देशात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्याने विक्रम प्रस्थापित केला आहे. या वाहतुकीतून रेल्वेला तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे.

भारतीय रेल्वेमध्ये अंदाजे चार ते पाच वर्षांपूर्वी कार, ट्रॅक्टर, जीप अशी छोटी चार चाकी वाहने वाहतुकीसाठी अवघे एलएचबीचे सहा रेक होते. चार ते पाच वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने याकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष देऊन जुने प्रवासी वाहतूक करणारे रेल्वे डब्यांमधील आसन व शौचालय काढून पोकळ रेल्वे डबा बनविला. एनएमजी म्हणजे न्यू मॉडिफाइड गुड्स रेक असून रेल्वेचे जे जुने झालेले डबे भंगारामध्ये देण्याच्या परिस्थितीचे झाले होते. त्यांना रेल्वे प्रशासनाने ॲल्युमिनियम कोचसारखे बनवून छोट्या कार वाहतुकीसाठी त्यांचा वापर केला जात आहे.

चौकट===

रेल्वे मालधक्क्याचा विक्रम

गेल्या तीन वर्षांपासून एनएमजीचे न्यू मॉडिफाइड रेक रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बनविल्याने चारचाकी गाडी बनविणाऱ्या कंपनीने रेल्वेकडे रेकची मागणी केली तर एक-दोन दिवसांत रेक उपलब्ध होऊन जातो. त्यामुळे कार बनविणाऱ्या कंपन्यांनी रेल्वेद्वारे नवीन कार विविध पाठविण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्यावरून दर महिन्याला एनएमजीचे २१ रेक पाठविण्यात आले होते. रेल्वेच्या एका रेकला पंचवीस डबे असून प्रत्येक डब्यात चार कार बसतात. महिंद्रा कंपनीचा हरिद्वार येथे प्लांट असून हरिद्वार रेल्वे मालधक्क्यावरून एनएमजीचे एका महिन्यात देशात सर्वाधिक २३ रेक पाठविण्याचा विक्रम होता. तो जुलै महिन्यात मोडीत निघाला. तब्बल २९ रेक राजस्थान, दिल्ली, आसाम, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश तसेच बिहारपर्यंत गेलेले रेल्वेचे रेकमधील काही गाड्या नेपाळ, बांगलादेशला देखील गेल्या. या रेकमधून २९०० गाड्या पाठविण्याचा विक्रम संपूर्ण देशात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्याने केला आहे. यामधून रेल्वे प्रशासनाला ४ कोटी २५ लाख ४४ हजार ४१२ रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे.

चौकट===

रेल्वे एनएमजीच्या रेकच्या डब्यामध्ये कार ठेवताना त्यांच्या चाकातील थोडी हवा कमी केल्याने नवीन गाडी रेल्वेच्या डब्यात कुठल्याही बाजूला टच होत नाही. तसेच चारही चाकांना पुढून व मागून लाकडाची उटी लावून तसेच गाडी गेअरमध्ये ठेवली जाते. यामुळे नवीन कार सहीसलामत कमी वेळेत व कमी खर्चात पाहिजे त्या ठिकाणी पोहोचत आहे.

प्रतिक्रिया==

रेल्वेने कार वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात नवीन एनएमजी रेक बनविल्याने संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून योग्य समन्वय साधल्याने रेल्वे प्रशासनाला त्यामधून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न रेल्वेला मिळविता आले. तसेच संबंधित कंपन्यांना देखील कमी खर्चात व कमी वेळेत सुरक्षितरीत्या नवीन गाड्या पाठवणे सहजरीत्या शक्य झाले.

-कुंदन महापात्रा, मुख्य माल पर्यवेक्षक, नाशिक रोड

(फोटो ३१ रेल्वे, महापात्रा)