एक्सप्रेसच्या धडकेने रेल्वे कामगार ठार
By Admin | Updated: October 6, 2014 00:16 IST2014-10-05T00:23:29+5:302014-10-06T00:16:43+5:30
एक्सप्रेसच्या धडकेने रेल्वे कामगार ठार

एक्सप्रेसच्या धडकेने रेल्वे कामगार ठार
नगरसूल : शनिवारी सकाळी औरंगाबादकडे जाणाऱ्या अमृतसर- नांदेड संचखड एक्स्पे्रसने भीमराव पंडित या रेल्वे कामगाराला नगरसूल रेल्वेस्थानकात जबर धडक दिल्याने त्यांचे जागीच निधन झाले. आज सकाळी कामावर आलेले भीमराव पंडीत हे स्थानकावर उभ्या असलेल्या नगरसूल-नरसापूर या एक्स प्रेसगाडीची तपासणी करून दादर जवळच रेल्वे खालून बाहेर येत असताना नांदेड संचखड एक्स्पे्रसने सकाळी अकरा वाजता त्यांना धडक दिल्याने ते जागीच ठार झाले हि घटना कोणाच्या लक्षात आली नाही पण संचखड चालकाच्या लक्षात आल्याने गाडी थांबवण्यात आली. रेल्वे स्टेशन अधीक्षक हरिष महाले यांना कळविण्यात आली. रेल्वे पोलिस सांनी याबाबत अकस्मात मुत्यूची नोंद केली आहे . (वार्ताहर)