रेल्वे गाड्या ‘फुल्ल’!

By Admin | Updated: October 28, 2014 00:22 IST2014-10-27T23:46:21+5:302014-10-28T00:22:40+5:30

परतीचा प्रवास : मनमाड जंक्शनवर प्रवाशांची गर्दी

Railway trains 'full'! | रेल्वे गाड्या ‘फुल्ल’!

रेल्वे गाड्या ‘फुल्ल’!

मनमाड : दिवाळीचा सण संपल्याने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांमुळे रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तर मनमाड रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलून गेले आहे.
वर्षभरातील सर्वात आनंदाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणासाठी नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व नागरिक आपआपल्या गावाला जाऊन दिवाळी साजरी करतात. नुकताच दिवाळीचा सण संपल्याने प्रत्येकजण नोकरीच्या गावाकडे पोहचण्याच्या प्रयत्नात आहे. परतीच्या प्रवाशांच्या गर्दीमुळे मनमाड रेल्वेस्थानकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून, रेल्वेगाड्या प्रवासांनी खचाखच भरलेल्या दिसत आहे.
या प्रवासांच्या गर्दीचा त्रास टाळण्यासाठी परिसरातील अनेक प्रवासी मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस तसेच इगतपुरी शटलने प्रवास करणे पसंत करत आहे. मनमाड रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या इतर गाड्यांमध्ये गर्दीमुळे बसण्यास जागा मिळत नसली, तरी मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळत असल्याने या गाड्या फलाटाला लागण्यापूर्वीच प्रवासी फलाट क्र.४ व ५ वर पोहोचत आहे.
प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकिटासाठी लांबच लांब रांगा असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेस्थानकावरील बुकिंग खिडक्या व्यतिरिक्त स्थानकाबाहेर खासगी बुकिंग ठेकेदाराकडे तिकिटे मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांनी फुलून गेले आहे. (वार्ताहर)
सायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यू
नाशिक : सायकलवरून पडून इंदिरानगर परिसरातील सिमतकुमार नाडार यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली़ सिमतकुमार नाडार (४६) हे सकाळी सायकलवरून पाथर्डी रस्त्याने जात होते़ पॉवर हाऊसजवळून जात असताना ते सायकलवरून पडले. (प्रतिनिधी)

Web Title: Railway trains 'full'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.