रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत घेतले फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:19 IST2018-08-31T23:44:19+5:302018-09-01T00:19:50+5:30

सर्व्हिस इम्प्रुव्हमेन्ट ग्रुप अंतर्गत भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान स्वच्छतेवरून त्यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले.

 Railway station officials spread about cleanliness | रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत घेतले फैलावर

रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत घेतले फैलावर

नाशिकरोड : सर्व्हिस इम्प्रुव्हमेन्ट ग्रुप अंतर्गत भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान स्वच्छतेवरून त्यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले.  भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेचा साडेपाच कोटींचा ठेका देऊनही स्थानकात अस्वच्छता असल्यामुळे मिश्रा यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले. रेल्वे ट्रॅकही स्वच्छ करावेत असे आदेश त्यांनी दिले.  यावेळी रेल्वेस्थानक वाणिज्य प्रमुख कुंदन महापात्रा, मुख्य तिकीट निरीक्षक एस. के. जैन, अतिरिक्त मंडल अभियंता विजय राव, एस. जी. सय्यद, प्रवीण पाटील, मंडल वाणिज्य निरीक्षक एस. एस. चापोरकर, सुबोध कुमार, आरोग्य निरीक्षक सी. के. गुप्ता, वरिष्ठ मंडल चिकित्सा अधिकारी बाविस्कर, अशोक कुमार शर्मा यावेळी उपस्थित होते.  रेल्वेस्थानकात सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करावी. तसेच विविध सूचना त्यांनी केल्या. थकीत रक्कम मिळावी, ठेका रद्द करावा, भ्रष्ट अधिकाºयांची व अन्य गैरप्रकारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मिश्रा यांच्याकडे केली. यावेळी मिश्रा यांनी कंत्राटी कामगारांना पूर्ण वेतन आणि मागील बाकी पूर्ण देत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे पेमेंट रोखण्यात आले आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.

Web Title:  Railway station officials spread about cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.