शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

रेल्वेसेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 1:08 AM

कल्याण येथील पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी (दि.१८) सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली त्याचा फटका नाशिकच्या प्रवाशांनाही बसला. पंचवटी, गोदावरी, राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिकऐवजी दौंडमार्गे धावली. दुपारी साडेतीननंतरही वाहतूक सुरळीत झाली नाही. मात्र सायंकाळी वाहतूक काही प्रमाणात पूर्ववत झाली.

ठळक मुद्देपत्री पुलाचा परिणाम : पंचवटी, गोदावरीसह अनेक गाड्या रद्द

नाशिकरोड : कल्याण येथील पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी (दि.१८) सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली त्याचा फटका नाशिकच्या प्रवाशांनाही बसला. पंचवटी, गोदावरी, राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिकऐवजी दौंडमार्गे धावली. दुपारी साडेतीननंतरही वाहतूक सुरळीत झाली नाही. मात्र सायंकाळी वाहतूक काही प्रमाणात पूर्ववत झाली.मागील आठवड्यात इगतपुरी रेल्वेस्थानकात महिनाभर सुरू असलेल्या कामांमुळे रेल्वेचे नुकसान झाले होते. आता कल्याणला विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. कल्याणचा विशेष मेगाब्लॉक असला तरी काही गाड्या नाशिकरोड स्थानकातून सकाळी धावल्या. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबईला न जाता नाशिकरोडपर्यंतच धावली. तेथूनच ती नागपूरला गेली. मुंबईहून पहाटे सुटलेली काशी एक्स्प्रेस सकाळी दहाला नाशिकरोडला आली. पवन आणि कामायनी एक्स्प्रेसही आल्या. सकाळी बनारस सुपर पावणे नऊला आली. देवळाली-भुसावळ शटल पहाटे पाचला गेली. भुसावळवरून सुटणारी हावडा-मुंबई एक्स्प्रेस, वाराणसी-एलटीटी आणि राजेंद्रनगर-पटना एक्स्प्रेस या गाड्या जळगाव-वसईरोड-दिवामार्गे धावली. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस,एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस याच मार्गाने भुसावळला गेली.जादा बसेस : रेल्वे प्रवाशांसाठी महामंडळाचे नियोजनदरम्यान, रेल्वे सेवा बंद असल्याने नाशिकरोड एसटी स्टॅन्डवर रविवारी गर्दी होती. या स्थानकातून आज पाचशे फेऱ्या झाल्या. त्यात लांबपल्ल्याच्या ३३० तर शहर बस वाहतुकीच्या २०० फेºयांचा समावेश होता. एसटी गाड्या मर्यादित असल्याने प्रवाशांची गाडीत जागा मिळविण्यासाठी चढाओढ होती.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीstate transportराज्य परीवहन महामंडळ