विद्यार्थ्यांनी साकारली रायगडाची प्रतिकृती
By Admin | Updated: November 19, 2015 22:09 IST2015-11-19T22:07:33+5:302015-11-19T22:09:04+5:30
विद्यार्थ्यांनी साकारली रायगडाची प्रतिकृती

विद्यार्थ्यांनी साकारली रायगडाची प्रतिकृती
सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मातीसह विविध वस्तू वापरून रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करत दिवाळी सुट्टीचा आनंद लुटला. इतिहासाचा अभिमान बाळगत व गडकिल्ल्यांचे महत्त्व समजून घेत विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
अनुराग कुलकर्णी, सुयोग खर्डे, ओम पवार, मंदार मुळे या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ कलाशिक्षक अनिल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला. पुठ्ठे, जुन्या लग्नपत्रिका, रद्दी या टाकाऊ वस्तूंबरोबरच दगड, विटा आणि मातीपासून डोंगराचा भाग व किल्ल्याचे गडकोट तयार केले. दोन दिवस केलेल्या सातत्यपूर्ण मेहनतीतून रायगडाची प्रतिकृती पूर्णत्वास आल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद शिगेला पोहचला. या कामासाठी मुलांना अनुरागची आई हंसाताई, बहिण प्रज्ञा यांनी मदत केली.
शिक्षकांनी शिकवताना आणि पुस्तके वाचताना किल्ले म्हणजे
काय ते थोडेफार समजले होते.
मात्र, मित्रांसमवेत किल्ल्याची प्रतिकृती बनवत असताना
त्याचे सखोल ज्ञान आणि महत्त्व समजल्याचे अनुराग याने सांगितले. मित्रांसमवेत खराखुरा रायगड किल्ला पाहण्यासाठी जाणार असल्याचेही तो म्हणाला.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीबद्दल नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गजानन होडे, सारडा विद्यालयाचे प्राचार्य ठाकरे, माधवी पंडित यांनी कौतुक केले
आहे. (वार्ताहर)