शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे
By Admin | Updated: August 18, 2016 00:30 IST2016-08-18T00:29:26+5:302016-08-18T00:30:59+5:30
पोलिसांची कारवाई : आठ संशयित ताब्यात

शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे
नाशिक : शहरातील पंचवटी व भद्रकाली परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर मंगळवारी (दि़१६) पोलिसांनी छापे टाकून आठ संशयितांना ताब्यात घेतले़ या संशयितांवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी परिसरातील कुमावतनगरमध्ये असलेल्या नवीन इमारतीच्या गाळ्यांमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मारुती मंदिर परिसरात छापा टाकून संशयित अभिजित वसंत परदेशीसह (रा.कुमावतनगर) अन्य चार जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले़
द्वारका परिसरातील अमरधाम रोडवर जुगार खेळणाऱ्या गयाउद्दीन फयाजउद्दीन सय्यद (रा. जहागिरवाडा, बागवानपुरा) व अन्य दोन जुगाऱ्यांवर भद्रकाली पोलिसांनी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या तिघांकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील जुगार अड्डे आणि गुंडगिरी करणाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भद्रकाली, जुने नाशिक, सिडको तसेच नाशिकरोड या भागात पोलिसांनी मोहीम राबविली आहे. (प्रतिनिधी)