जुगार अड्ड्यावर छापा; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:49 IST2020-06-22T22:49:02+5:302020-06-22T22:49:25+5:30
मालेगाव : येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अब्बासशेठ कारखान्यासमोर शकील अहमद यांच्या घराच्या धाब्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुगार अड्ड्यावर छापा; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
मालेगाव : येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अब्बासशेठ कारखान्यासमोर शकील अहमद यांच्या घराच्या धाब्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्री सव्वा वाजेच्या दरम्यान विशेष पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कर्मचारी तुषार अहिरे, अभिजीत साबळे, दिनेश शेरावते, समाधान सानप यांनी छापा टाकला. आरोपी शकील अहमद मोहंमद हनीफ (५०) रा. इस्लापुरा, मच्छीबाजार, मोहंमद आफताब मोहंमद समद (३९) रा. म्हाडा कॉलनी, घर नं. ९९६, आयेशानगर, एकलाख अहमद मोहंमद अन्वर (५०) रा. शब्बीरनगर, प्लॉट नंबर २९, शेख युनुस शेख शब्बीर (५२) रा. नंदननगर, आरीफखान समीरखान (५३) रा. अब्दूल खालीकनगर, आयेशानगर, शेख मुख्तार शेख रशीद (५३) रा. आयेशानगर, पठाण मोसीन हकीम खान (३४) रा. स. नं. ५४, मदिनाबाद हे अवैधरित्या रमी नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून १४ हजार रूपयांची रोकड, १३ हजार ५०० रूपयांचे पाच भ्रमणध्वनी, ३५ हजारांच्या दोन मोटरसायकली असा एकूण ६३ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.