जुगार अड्ड्यावर छापा; २७ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST2020-12-17T04:41:02+5:302020-12-17T04:41:02+5:30

नाशिक : मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी शिवारात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

Raids on gambling dens; 27 arrested | जुगार अड्ड्यावर छापा; २७ जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर छापा; २७ जण ताब्यात

नाशिक : मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी शिवारात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, २७ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनपुरी शिवारात शेतातील एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केली. विश्वनाथ सिद्धेश खैरनार यांच्या शेतात पिंटू अशोक अहिरे (३६, रा. मोतीबाग नाका) हा जुगार अड्डा चालवत असल्याचे आढळून आले. जुगाऱ्यांच्या ताब्यातून भ्रमणध्वनी संच, दुचाकी व ३ लाख २८ हजार ७२० रोख रक्कम असा एकूण ५ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Raids on gambling dens; 27 arrested