भद्रकाली, इंदिरानगरमधील जुगार अड्ड्यांवर छापे

By Admin | Updated: April 8, 2017 01:02 IST2017-04-08T01:02:38+5:302017-04-08T01:02:51+5:30

नाशिक : भद्रकाली व इंदिरानगर परिसरातील जुगार अड्ड्यांवर गुरुवारी (दि़६) दुपारी व सायंकाळी पोलिसांनी छापे टाकले़.

Raids on gambling baskets in Bhadrakali, Indiranagar | भद्रकाली, इंदिरानगरमधील जुगार अड्ड्यांवर छापे

भद्रकाली, इंदिरानगरमधील जुगार अड्ड्यांवर छापे

 नाशिक : भद्रकाली व इंदिरानगर परिसरातील जुगार अड्ड्यांवर गुरुवारी (दि़६) दुपारी व सायंकाळी पोलिसांनी छापे टाकले़ यामध्ये सात जुगारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या कत्तलखान्याच्या पाठीमागे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार दुपारच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित दत्तू बेंडकुळे, समीर यादव, फैसरअली महम्मद अली सय्यद हे दत्तू बेंडकुळे, समीर यादव, फैसरअली महम्मद अली सय्यद हे टाइम बाजार नावाचा जुगार खेळत होते़ या तिघांनाही भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत़
दुसरा छापा इंदिरानगर पोलिसांनी पाथर्डी गावातील राजवाडा परिसरात टाकला़ एका घरावरील पत्र्यांच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती मिळताच रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित सुनील हांडे, नितीन साळवे, दीपक मोरे व राकेश पाळदे हे अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते़ या संशयितांकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Raids on gambling baskets in Bhadrakali, Indiranagar