भद्रकालीत जुगार अड्ड्यावर छापे;

By Admin | Updated: August 27, 2016 00:19 IST2016-08-27T00:19:38+5:302016-08-27T00:19:47+5:30

२५ जुगारी ताब्यात

Raids in Bhadrakali gambling station; | भद्रकालीत जुगार अड्ड्यावर छापे;

भद्रकालीत जुगार अड्ड्यावर छापे;


नाशिक : भद्रकाली परिसरातील दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापे टाकून २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे २७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे़ या जुगाऱ्यांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भद्रकालीतील चव्हाट्यामध्ये असलेल्या मारुती मंदिराच्या वरील समाजमंदिरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी (दि़२४) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी संशयित गणेश हिरामण तारे (वय ३१, रा़ मीरा अपार्टमेंट पाटीदार भवन, वैद्यनगर, नाशिक) हा १२ साथीदारांसमवेत अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होता़ पोलिसांनी या जुगाऱ्यांकडून १६ हजार ५०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
दुसरा छापा सवेरा बिल्डिंग, रहिम स्वीटशेजारील बोळीतील जुगार अड्ड्यावर टाकण्यात आला़ या ठिकाणी संशयित रफिक शेख जैनोद्दीन (५०, हेलबावडी, नाशिक) हा अकरा साथीदारांसमवेत अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Raids in Bhadrakali gambling station;