शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रेवर खुनातील संशयिताच्या कुटुंबीयांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:30 IST

सराईत गुन्हेगार मनीष रेवर याच्या खुनातील प्रमुख संशयित चेतन लेवे याच्या पेठ रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कर्णनगर परिसरातील घरासमोर तिघा संशयितांनी धुडगूस घालून लेवे कुटुंबीयांना धमकी देऊन दुचाकीची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळच्या सुमारास घडली.

नाशिक : सराईत गुन्हेगार मनीष रेवर याच्या खुनातील प्रमुख संशयित चेतन लेवे याच्या पेठ रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कर्णनगर परिसरातील घरासमोर तिघा संशयितांनी धुडगूस घालून लेवे कुटुंबीयांना धमकी देऊन दुचाकीची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळच्या सुमारास घडली.पंचवटी पोलीस ठाण्यात सचिन लेवे (रा. कर्णनगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास संशयित विजय बाळासाहेब तारगे (२३, रा. हनुमानवाडी), हेमंत अशोक पवार (२३, पंचवटी) व लखन वसंत लुले (२३, रा. पंचवटी) हे घरासमोर आले़ तसेच ‘कुठे आहे तो चेत्या? त्याला आता आम्ही संपवून टाकतो. त्याने आमच्या मनीष रेवर या मित्राचा खून केला आहे. त्यामुळे आम्ही चेत्याला जिवंत सोडणार नाही’ असे मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली. तसेच हातात तलवार घेऊन येत दहशत निर्माण करून या तलवारीने येथे उभी असलेली डिओ दुचाकीच्या (एमएच १५ ईओ ०९४३) हेडलाइटच्या काचा फोडून सीटकव्हर फाडले, तर चेत्या लेवे आम्हाला सापडला नाही, तर तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.  या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित तारबे, पवार व लुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी