शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

ओझर येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 21:07 IST

ओझर : अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन ठिकाणाहून २७५५ रु पये किमतीच्या गावठी दारूसह देशी दारू जप्त केली असून, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ओझर : अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन ठिकाणाहून २७५५ रु पये किमतीच्या गावठी दारूसह देशी दारू जप्त केली असून, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लॉकडाउनदरम्यान ओझर (कांजर घाट) सुकेणे, दीक्षी रोड श्रमिकनगर येथे गावठी दारू व सरकारवाडा येथे देशी दारू विक्रीचा अवैधरीत्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा रंगत होती. त्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह कॉन्स्टेबल बाळासाहेब पानसरे, भास्कर पवार, नितीन कारंडे, शिंदे, माधुरी गायकवाड, दुर्गा खाने, मनीषा गायकवाड यांनी श्रमिकनगर भागात धडक कार्यवाही करत हजार रुपयांची हातभट्टीची गावठी दारू हस्तगत करून एका महिलेविरुद्ध कारवाई केली. तसेच सरकारवाडा भागात देशी दारू विक्री करणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून २७ मदिरा देशी दारूच्या १७५५ रुपये किमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण २७५५ रुपयांची दारू हस्तगत करून दोन्ही महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.------तळीरामांची आबळ झाल्याने मद्य बनवण्याचे घरगुती उपाय सुचवले जात आहेत. त्यात काळा खराब गूळ आणि नवसागर नामक वस्तूची होणारी अवैध विक्र ी हे खरे मूळ आहे. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केल्यास परिसरात आणखीन हटभट्ट्या उद्ध्वस्त होतील. त्यातून अनेक कुटुंबांचे होणारे नुकसान टळेल. मध्यंतरी दारूची अवैध होणारी विक्री चर्चेचा विषय बनू पाहत असताना पोलिसांनी केलेले कोम्बिंग आॅपरेशन कायमस्वरूपी राहो इतकीच माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक