पेठरोडच्या जुगार अड्ड्यावर छापा; ९ जणांवर कारवाई
By Admin | Updated: September 23, 2015 00:23 IST2015-09-23T00:23:14+5:302015-09-23T00:23:36+5:30
पेठरोडच्या जुगार अड्ड्यावर छापा; ९ जणांवर कारवाई

पेठरोडच्या जुगार अड्ड्यावर छापा; ९ जणांवर कारवाई
नाशिक : पेठरोडवरील बी झेड अपार्टमेंट परिसरात कल्याण वरळी नावाचा जुगार खेळणाऱ्या ९ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे पावणेचार लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
याबाबत माहिती अशी की, पेठरोड परिसरात बी झेड अपार्टमेंट असून या ठिकाणी संशयित आरोपी हर्षल गुंजाळ तसेच लक्ष्मण नलावडे आणि त्यांचे इतर सात साथीदार असे नऊ जण मुंबई कल्याण वरळी नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच दुपारच्या सुमाराला पोलिसांनी सापळा रचून या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्याठिकाणी पोलिसांना नऊ संशयित मिळून आले.
पोलिसांनी या संशयितांकडून जवळपास पावणेचार लाख रुपयांची रोकड जप्त करून मुंबई पोलीस जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पंचवटीत यापूर्वीही पोलिसांनी अशाचप्रकारे छापे टाकले होते. (प्रतिनिधी)