शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नाशिक जिल्ह्यात अफूच्या शेतीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 00:21 IST

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात शेतकऱ्याने अफूची शेती फुुलविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वावी ...

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात शेतकऱ्याने अफूची शेती फुुलविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वावी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या शेतीवर छापा टाकून सर्व अफूची झाडे जप्त करीत कारवाई केली. यात २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल वावी पोलिसांनी ताब्यात घेऊन शेतकऱ्यास अटक केली आहे.फुलेनगर (माळवाडी) येथे सुमारे एक गुंठा जमिनीत अफूची लागवड केली असल्याची गुप्त माहिती वावी पोलिसांना समजली. त्यावरून वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अपर अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी पथकाची निर्मिती केली. गुरुवारी (दि.१७) सायंकाळी सहायक निरीक्षक सागर कोते, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, हवालदार योगेश शिंदे, नितीन जगताप, प्रकाश चव्हाण, गोविंद सूर्यवाड यांच्यासह पोलिसांच्या पथकाने फुलेनगर शिवारातील शेतीवर छापा टाकला. यावेळी संशयित शेतकरी विलास कृष्णाजी अत्रे (वय ६२) यांच्या शेत गट नंबर ४०५ मध्ये सुमारे एक गुंठा जागेत अफूचे पीक घेतल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले.नायब तहसीलदार सागर मुंदडा, मंडळ कृषी अधिकारी अशोक बागूल, तलाठी कैलास गायकवाड, सोपान गुुळवे यांच्या उपस्थितीत अफू शेत पिकाचा पंचनामा करण्यात आला. सुमारे दोन ते अडीच महिन्यांची शेतातील सर्व अफूची झाडे पोलिसांनी उपटून जप्त केली. सुमारे १३० किलो वजन असलेली ओली व सुकी अफूच्या झाडांची किंमत २ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. अफूच्या शेतीभोवती तीनही बाजूने मका पीक घेण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी