जुगार अड्ड्यांवर छापे; रोकड जप्त

By Admin | Updated: February 3, 2017 00:48 IST2017-02-03T00:48:46+5:302017-02-03T00:48:58+5:30

भद्रकाली : अवैध धंद्यांवर छापे; ४२ जुगारी ताब्यात

Raid on gambling bases; Cash seized | जुगार अड्ड्यांवर छापे; रोकड जप्त

जुगार अड्ड्यांवर छापे; रोकड जप्त

नाशिक : भद्रकाली परिसरातील कथडा व बागवानपुरा येथे सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून ४२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे ८२ हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या विशेष पथकांनी ही कारवाई केली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे़
भद्रकालीतील बागवानपुऱ्यातील सपना हॉटेलसमोरील एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीनुसार बुधवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास छापा टाकला असता संशयित सचिन रामचंद्र पाटील व त्याचे १३ साथीदार पत्त्यावर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये रोख रकमेचाही समावेश आहे़ या सर्वांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दुसरा छापा कथडा परिसरातील शिवनेरी झोपडपट्टीत मारला़ त्याठिकाणी संशयित युवराज म्हसकरसह २२ इसम जुगार खेळत होते़ या संशयितांकडून ५ हजार ६० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Raid on gambling bases; Cash seized