शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

 बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा ; दोघा संशयितांना अटक ;  उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:07 AM

आडगाव शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मिती कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़ या छाप्यामध्ये गोरख भीमाजी ढेरिंगे (३४, रा. पळसे) व विलास भानुदास थोरात (३९, रा. कोनार्कनगर) या दोन संशयितांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देआडगाव शिवारात बनावट मद्यनिर्मिती कारखाना नामांकित कंपनींचा सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा कारखान्यात मध्य प्रदेश निर्मित व राज्यात बंदी असलेल्या बॉम्बे स्पेशल व्हिस्की

नाशिक : आडगाव शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मिती कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़ या छाप्यामध्ये गोरख भीमाजी ढेरिंगे (३४, रा. पळसे) व विलास भानुदास थोरात (३९, रा. कोनार्कनगर) या दोन संशयितांना अटक करण्यात आली.  या ठिकाणाहून विविध नामांकित कंपनींचा सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे सुमित राजेश बागडे (रा. कोणार्कनगर) आणि संदीप बाजीराव जाधव (रा. पळसे, ता. जि. नाशिक) हे दोन संशयित फरार झाले असून, अनेक दिवसांपासून हा कारखाना सुरू असल्याचे समोर आले आहे़  शहरात बनावट मद्यनिर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती़ त्यानुसार विभागीय भरारी पथकाने शनिवारी (दि़११) रात्री आडगाव शिवारात कोणार्क मधील बालाजीनगर येथे पथकासह छापा टाकला़ या ठिकाणी संशयित गोरख ढेरिंगे आणि विलास थोरात हे मद्यनिर्मिती करीत होते, तर त्यांचे साथीदार बागडे व जाधव हे कारवाईची चाहूल लागताच फरार झाले़या मद्यनिर्मिती कारखान्यात मध्य प्रदेश निर्मित व राज्यात बंदी असलेल्या बॉम्बे स्पेशल व्हिस्की, मॅकडॉवेल, बॅगपायपर, आॅफिसर चॉईस, डिप्लोमेट या विदेशी मद्यांसह प्रिन्स संत्रा या देशी दारूचा साठा आढळून आला़ तसेच बनावट निर्मितीसाठी वापरण्यात येणारी विविध साहित्य, प्लॅस्टिक ड्रम, टोचे, चाकू व मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी डीओ (एमएच १५, इएन ८६६७) दुचाकी असा सुमारे १ लाख १५ हजार १८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़  ७५ हजारांचे मद्य जप्त सुरगाणा तालुक्यातील कुकडणे शिवारातील एका घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून दमन निर्मित ७५ हजार १२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला़ त्यामध्ये किंगफिशर स्ट्रॉँग बिअरचे ११ बॉक्स, जॉन मार्टिन प्रीमिअम व्हिस्कीचे ४ बॉक्स, इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की ४ बॉक्सचा समावेश आहे.