शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

राहुलनगर बुडाले शोकसागरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:30 IST

जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला.

नाशिक : जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला. अगदी घराला घरे लागून असलेल्या चार घरांमधील कुणा ना कुणी अपघातात मरण पावल्याने येथील प्रत्येकाचा शोक अनावर झाला होता. अवघ्या सहा महिन्यांचे बाळही या अपघात दगावल्याने बाळाच्या वडिलांच्या आक्रोशाने साऱ्यांचेच हृदय हेलावले. मन सुन्न करणाºया या घटनेमुळे संपूर्ण नाशिकरोड परिसरात शोककळा पसरली आहे.टाकळीतील राहुलनगर परिसरातील स्वप्नील कांडेकर यांच्या घरी त्यांचा मुलगा त्रिशाल याच्या जावळ काढण्याचा कार्यक्रम होता. राहुलनगर परिसरात कांडेकर, डांगे, लोंढे आणि गवळी, कुटुंबीय अगदी जवळच राहतात. कोणत्याही कार्यक्रमासाठी हे कुटुंबीय एकत्र येतात. जावळाच्या कार्यक्रमासाठीदेखील सर्वच आयशर टेम्पोने केदराईदेवस्थानकडे निघाले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शिवारात दोन आयशर गाड्यांमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने या कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये सुशीला सुरेश गवळी (६६), निवृत्ती रामभाऊ लोंढ (५०), शोभाबाई सूर्यवंशी (६०), सुदाम पाटणकर (६६), सुंदराबाई आनंदा कांडेकर (८०) आशा दत्तात्रय कांडेकर (४७) समृद्धी मनीष डांगे (सहा महिने) यांना काळाने हिरावून घेतले. यातील बहुतांश कुटुंबीय हे राहुलनगर परिसरातच वास्तव्यास आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील सासू-सुनेचा मृत्यू झाला. तर अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही काळाने हिरावून नेल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.सातत्याने वर्दळ आणि गजबजलेल्या टाकळी परिसरात रविवार सकाळपासून स्मशानशांतता पसरली होती. संपूर्ण राहुलनगर परिसरात काळाची गडद छाया पसरली होती.घटनेचे वृत्त कळताच राहुल दिवे, प्रशांत दिवे, रवी पगारे, सचिन साळवे, नगरसेवक अनिल ताजनपुरे, आशा तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. राहुलनरमध्ये जाऊन त्यांनी उर्वरित कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूअपघातात आशा दत्तात्रय कांडेकर यांच्यासह त्यांच्या सासू सुंदराबाई कांडेकर व आई सुशीला सुरेश गवळी यांचा मृत्यू झाला.पत्नीची साथ सुटलीसूर्यवंशी दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने ते राहुलनगरमध्येच आपल्या भाच्याच्या आश्रयाने राहत होते. अपघातात शोभा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने एकाकी पडलेल्या सूर्यवंशी यांना धक्का बसला आहे.सर्वांचाच प्रवासठरला अखेरचाघरातील कोणत्याही कार्यासाठी एकत्र जाणाºया कुटुंबीयांचा रविवारचा प्रवास अखेरचा ठरला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू