पळाशीच्या उपसरपंचपदी राहुल घुगे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:54 IST2019-12-26T22:53:13+5:302019-12-26T22:54:12+5:30
नांदगाव तालुक्यातील पळाशीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राहुल घुगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

पळाशीच्या उपसरपंचपदी राहुल घुगे बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना दिलीप शेवाळे, गंगाधर आव्हाड, विठ्ठल शेवाळे, साईनाथ पवार, बाजीराव शेवाळे, दिलीप शेवाळे आदी.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील पळाशीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राहुल घुगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी पी. आर. नकले यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया पार पडली. सुनंदा सांगळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रिक्त उपसरपंचपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. राहुल घुगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी पोपट घुगे, गोरख सांगळे, वाल्मीक शेवाळे, काळू सांगळे, पंढरीनाथ आव्हाड, रवि पवार, रवि शेवाळे, पंढरीनाथ गायकवाड, माणिक आव्हाड, प्रकाश आव्हाड व ग्रामस्थ उपस्थित होते.