शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार

By संजय पाठक | Updated: March 12, 2024 10:57 IST

या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत.

नाशिक- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या म्हणजे बुधवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे येणार आहे. त्यानंतर गुरुवारी चांदवड येथे त्यांची सभा होणार असून नाशिक शहरात रोड शो होणार आहे. या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उद्या नाशिकच्या दौऱ्यावर असून  निफाड तालुक्यात शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत तर खासदार संजय राऊत यांचे आज नाशिकमध्ये आगमन होणार असून सिन्नर तालुक्यात एका धार्मिक कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर त्यांचा नाशिकमध्ये तीन दिवस मुक्काम असणार आहे. या दरम्यान ते राहुल गांधी यांच्या समवेत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी चांदवड येथे राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतर ते पिंपळगाव ओझर मार्गे नाशिक शहरात दाखल होणार आहेत शहरातील द्वारका चौफुली येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे तेथून जुने नाशिक दूध बाजार, गाडगे महाराज चौक ते शालिमार म्हणजेच इंदिरा गांधी चौक असा त्यांचा रोड शो होणार आहे शालिमार येथे त्यांची चौक सभा होणार असून त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रवाना होणार आहेत आणि तेथून पुढे पालघर कडे मार्गस्थ होणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा