राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आज जिल्'ात

By Admin | Updated: October 9, 2014 22:37 IST2014-10-09T22:36:49+5:302014-10-09T22:37:04+5:30

चार पक्षनेते एकाच दिवशी

Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thakre | राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आज जिल्'ात

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आज जिल्'ात

नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. १०) शहर व जिल्'ात एकाच वेळी भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते डेरेदाखल होत असून, त्यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सटाणा येथे सकाळी पावणेअकरा वाजता कळवणला सभा होत असून, त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता बागलाण व त्यानंतर दिंडोरी येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड येथे सायंकाळी पवार यांची सभा असून, त्यानंतर रात्री पावणेआठ वाजता नाशिक शहरातील राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांसाठी नाशिकरोड येथे एक सभा घेणार आहेत. विरोधी पक्षनेते भाजपाचे विनोद तावडे यांची सकाळी झोडगे येथे सभा होऊन दुपारी पिंपळगाव बसवंत येथे दुसरी सभा होणार आहे. कॉँग्रेसच्या जिल्'ातील सर्व उमेदवारांसाठी कॉँग्रेस पक्षाचे महासचिव खासदार राहुल गांधी यांची दुपारी १२ वाजता कसबे वणी (दिंडोरी) येथे सभा होणार आहे. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही तीन सभांचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी मनमाडला, तर चार ते पाचच्या सुमारास येवला व रात्री आठ वाजता शिवसेनेच्या जिल्'ातील उमेदवारांसाठी गोल्फ क्लब मैदानावर सभा होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thakre