Raghunath Bharatsat, Ugalmugale Police Medal | रघुनाथ भरसट, उगलमुगले यांना पोलीसपदक
रघुनाथ भरसट, उगलमुगले यांना पोलीसपदक

नाशिक : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाच्या वतीने पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्टÑपतिपदक जाहीर करण्यात आले. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील उपनिरीक्षक रघुनाथ भरसट व सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय उगलमुगले यांचा त्यात समावेश आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलात दहशतवाद विरोधी कक्षामध्ये कार्यरत असलेले भरसट यांना विशेष पोलीसपदक जाहीर झाले. हरसूल हरणटेकडीचे भरसट हे २२ आॅगस्ट १९८९ साली नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांनी कळवण, हरसूल, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी,
अभोणा, पेठ या आदिवासी भागातील पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावली आहे.
२०१३ साली पोलीस खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले. त्यांना सेवाकाळात १५० रिवॉर्ड मिळाले आहेत. 
आदिवासी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले उगलमुगले यांनादेखील पोलीस पदक जाहीर झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी असलेले उगलमुगले मार्च १९८९ साली नाशिक ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले.
२००४ सालापर्यंत उगलमुगले यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात कर्तव्य बजावले. त्यानंतर नाशिक तालुका पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि सध्या वाचक शाखेमध्ये ते सेवा बजावत आहेत. उगलमुगले यांनी आतापर्यंत ४८० रिवॉर्ड मिळविले आहेत.
राज्यातील मानकरी
स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे देण्यात येणाऱ्या राष्टÑपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ४६ पोलिसांना या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवेकरिता मुंबईतील सहाय्यक आयुक्त मिलिंद खेतले यांना गौरविण्यात आले. -वृत्त/पान ७
पुणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक राजाराम रामराव पाटील, पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट-२ चे हरिश्चंद्र गोपाळ काळे, कोल्हापूरचे जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर प्रशंसनीय सेवेकरिता राज्य दहशतवाद विभागाचे मुंबईतील पोलीस उपायुक्त विक्रम नंदकुमार देशमाने, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त नेताजी शेकुंबर भोपळे, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील, डोंगरी विभागाचे सहायक आयुक्त अविनाश धर्माधिकारी, साकीनाका पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अब्दुल शेख, पायधूनी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रकाश कदम, गुन्हे शाखेतील हवालदार गणेश गोरेगावकर आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील हवालदार श्रीरंग सावरडे यांचा समावेश आहे.
पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ 


Web Title:  Raghunath Bharatsat, Ugalmugale Police Medal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.