सिंहस्थातील अफवा रोखणार रेडिओ

By Admin | Updated: April 11, 2015 00:37 IST2015-04-11T00:29:36+5:302015-04-11T00:37:44+5:30

सिंहस्थातील अफवा रोखणार रेडिओ

Radio will prevent rumors in Simhastha | सिंहस्थातील अफवा रोखणार रेडिओ

सिंहस्थातील अफवा रोखणार रेडिओ

नाशिक : गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर शहरात अफवांना पेव फुटले होते. आगामी सिंहस्थात अफवा टाळण्यासाठी प्रशासन रेडिओचा आधार घेणार आहे. तसेच पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम ही प्रणालीदेखील राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिले.
हल्ली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जातात. सिंहस्थातही अशाप्रकारच्या अफवा पसरविल्या जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने विविध उपाययोजनांवर विचार केला आहे. त्यामध्ये पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम प्रभावीपणे राबविले जाणार आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून नागरिकांना वेळोवेळी घडत असलेल्या घटनांची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर याकाळात प्रशासना-मार्फत धावणाऱ्या तीन हजार बसेसमध्ये रेडिओ बसविण्यात येणार असून, नागरिकांना रेडिओच्या माध्यमातून माहिती कळविली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Radio will prevent rumors in Simhastha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.