शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

महापालिकेत राडा; राजदंडाची ओढाताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:05 IST

नाशिक : महिला व बाल कल्याण समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याच्या आक्षेपानंतर ही कामे रद्द करण्याच्या मागणीसाठी सरसावलेल्या शिवसेनेच्या महिलांना कॉँग्रेस आणि राष्टÑवादीची साथ मिळाली आणि पीठासनासमोर अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपाचे नगरसेवकही मैदानात उतरल्यानंतर आधी गोंधळ, मग घोषणाबाजी त्यानंतर माईक ओढल्यानंतरही महापौर रंजना भानसी ऐकत नसल्याने अखेरीस राजदंडाची ओढाताण सुरू झाली आणि या गदारोळात राष्ट्रगीत सुरू करून महापौरांनी कामकाजच संपविले.

ठळक मुद्देमहासभेचा झाला आखाडाअनेक नगरसेविकांना दुखापत पीठासनावरील माईक ओढले,

नाशिक : महिला व बाल कल्याण समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याच्या आक्षेपानंतर ही कामे रद्द करण्याच्या मागणीसाठी सरसावलेल्या शिवसेनेच्या महिलांना कॉँग्रेस आणि राष्टÑवादीची साथ मिळाली आणि पीठासनासमोर अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपाचे नगरसेवकही मैदानात उतरल्यानंतर आधी गोंधळ, मग घोषणाबाजी त्यानंतर माईक ओढल्यानंतरही महापौर रंजना भानसी ऐकत नसल्याने अखेरीस राजदंडाची ओढाताण सुरू झाली आणि या गदारोळात राष्ट्रगीत सुरू करून महापौरांनी कामकाजच संपविले.सोमवारी (दि.९) झालेल्या महासभेत सुरू असलेल्या या गदारोळात महापौरांनी महिला व बाल कल्याण समितीच्या नूतन सदस्यांची नावेच जेमतेम घोषित करू शकल्या. परंतु नंतर मात्र त्यांनी सर्व समिती सदस्यांची नावे घोषित झाल्याचा अजब दावा केला. या प्रकारामुळे नाशिककरांना अस्वस्थ करणाºया करवाढीच्या मुद्द्यावर चर्चाच झाली नाही. महापालिकेची महासभा सोमवारी (दि.९) सकाळी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. सर्वच विषय मंजूर झाल्याचा दावासभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर महापौरांनी सभागृहाचे कामकाज गुंडाळले. त्यानंतर त्यांच्या दालनात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. महापौरांनी सभेचे कामकाज अर्धवट राहिले आणि नंतर सभा बोलवू, असे सुरुवातीला सांगितले. मात्र, नंतर सर्व विषय मंजूर झाल्याचे घोषित केले तेव्हा माईक बंद होता आता नव्याने सभा बोलाविण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी महापौरांना विचारलेल्या प्रश्नांना आधी गटनेते संभाजी मोरूस्कर उत्तरे देत होते. अन्य विषय समितीच्या सदस्यांची नावे घोषित झाल्याचा दावा मोरूस्करांनी केला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना आयुक्तांनी त्यांना समिती सदस्यांच्या नावांची प्रेस नोट द्या, असे सूचवले. त्यामुळे एकंदरच सत्तारूढ भाजपा आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात समन्वय वाढल्याचे दिसून आले. विशेषत: महापौर भानसी यांनी आयुक्तांशी चर्चा करूनच अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सभेत महिला व बाल कल्याण समिती, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती, विधी आणि शहर सुधार समिती अशा चार समिती सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी बोलाविलेल्या महासभेच्या प्रारंभी २० फेबु्रवारी रोजी झालेल्या महासभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय होता. २० फेबु्रवारीस झालेल्या महासभेत शहरात करवाढ लागू करण्याच्या विषयावरून विरोधकांनी गोंधळ घालत बहिष्काराचे अस्त्र उगारले होते. तरीही विरोध डावलून भाजपाने शहरवासीयांवर ३६ टक्के करवाढ लादली होती. त्याविरोधात पडसाद उमटल्याने प्रशासनाकडे ठराव पाठविताना महापौरांनी १८ टक्के करवाढीचाच प्रस्ताव मान्य केल्याचे कळविले होते. दरम्यानच्या काळात आयुक्तांनी सर्व मिळकतींवर कर लागू करण्यासाठी पावले उचलत अगदी मोकळ्या जागा आणि शेती क्षेत्रावरही कर लागू केल्याने त्याचे पडसाद महासभेत उमटण्याची शक्यता होती.विरोधकांनी तशी तयारी केली होती. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रारंभीच इतिवृत्त मंजुरीच्या विषयावरून राष्टÑवादीचे गजानन शेलार यांनी आक्षेप घेतला. घरपट्टीत वाढ करण्याच्या विषयावरून विरोधकांनी गोंधळ घातला होता आणि बहिष्कार घातला होता. घरपट्टीबाबतच उपसूचनाही केली असताना या सर्व घडामोडींचा उल्लेख न करता घरपट्टी दरवाढ सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगताच महापौरांनी त्यात दुरुस्ती करू, असे सांगितले.