जायखेड्यात धावण्याची स्पर्धां
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:39 IST2020-02-23T15:24:48+5:302020-02-23T15:39:16+5:30
या स्पर्धेत आलियाबाद व परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

जायखेड्यात धावण्याची स्पर्धां
ठळक मुद्देया स्पर्धेतील पंडित चौधरी,या इतर विजेत्या स्पर्धकांना आमदार बोरसे व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आयोजकांमार्फत रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
दोन किलोमीटरच्या या रिनंग स्पर्धेत जैतापूर येथील धावपटू बाळू पंडित चौधरी याने बाजी मारली. त्याला प्रथम क्र मांक मिळाल्या बद्दल आमदार दिलीप बोरसे यांनी वैयक्तिक पाच हजार एक रु पयांचे दिले. यावेळी आलियाबादच्या सरपंच रेखा बागुल, उपसरपंच दिपक जाधव, पोलीस पाटील शिवाजी जगताप, भास्कर गांगुर्डे, धनाजी चौरे, ग्रामसेवक संदीप भामरे, वैभव गांगुर्डे आदीं उपस्थित होते.
फोटो- आलियाबाद येथे आयोजित धावण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी आमदार दिलीप बोरसे, नारायण गांगुर्डे, प्रकाश गायकवाड, उत्तम चौरे, राजेंद्र पवार , रोहिदास गवळी व धावपट्टू.
(23जायखेडा आलियाबाद)