शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:10 IST

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त जास्त पाऊस झाल्याने जलसाठे भरले आहेत. रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली असून, कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

ठळक मुद्देसिन्नर : सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी

यंदा ८०३ मिमी इतका पाऊस झाल्याने जलपातळीही झपाट्याने सुधारण्यास मदत झाली. रब्बीच्या अखेरपर्यंत विहिरींची जलपातळी टिकून राहण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. ठाणगाव, चास, नळवाडी, कोनांबे, पांढुर्ली, नांदूरशिंगोटे या परिसरात भूजल पातळी टिकून आहे. वावी, पंचाळे, शहा टंचाईग्रस्त मानल्या जाणाऱ्या या परिसरातही भूजल पातळी समाधानकारक असल्याने रब्बीखालील क्षेत्र वाढले आहे. रब्बी पिकांची एकूण चौदा हजार ६६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीची १,५६८, मका १,७६८ तर हरभऱ्याची तीन हजार ९९४ हेक्टरवर पेरणी झाली. गव्हाच्या क्षेत्रात यंदा ५०० हेक्टरने वाढ झाली आहे. ज्वारीचेही क्षेत्र दीडशे हेक्टरने वाढले आहे.तालुक्यात गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांसाठी स्पर्धा होत आहे. शेतकऱ्यास यात सहभागी होता येईल. रब्बीतील पीक कापणी प्रयोगासाठी गावनिहाय समितीही गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्यास पाच हजार, द्वितीय क्रमांकास तीन तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे बक्षीस सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.३,२५२ हेक्टरवर कांदा लागवडरब्बी कांदा लागवड यंदा ३,२५२ हेक्टरवर करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात १,२२१ हेक्टरवर, तर वावी परिसरात १,०५२ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. नायगाव, ब्राह्मणवाडे, गुळवंच, नांदूरशिंगोटे, डुबेरे, सोनांबे परिसरात कांद्याची लागवड झाली आहे.पिकांवर दुष्परिणामरब्बी पिकांवर बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येत आहे. ढगाळ हवामानामुळे माव्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वाढला आहे. धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम झाला आहे. त्यातच कमी दाबाने व खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती