शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:53 IST

पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे.

पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे. शेतकर्यांना पिकांवर दिवसाआड औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ झाली असल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे.असून तो दुहेरी संकटात सापडला आहे.तब्बल मिहनाभर चाललेल्या अवकाळी पावसाने येवला तालुक्यातील खरीपाची संपूर्ण वाताहत झाली तर द्राक्ष व डाळिंब बागाही गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले . असे असतानाही शेतकरी वर्गाने रब्बीसाठी पाणी उपलब्ध असल्याने .कांदा ,गहू, हरभरा,आदि पिकांची लागवड केली. खरीप नाही तर आता रब्बी पिकात उणीव भरून काढूया या आशेवर असणार्या शेतकर्यांची निसर्गाच्या लहरीपणा घोर निराशा केली.परिसरात तब्बल दोन अडीच मिहने ढगाळ वातावरण असून जोडीला दाट धुके, व दव आहेच त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य किडी व रोगांचा फैलाव मोठया प्रमाणात होत असून पिकांच्या कोवळ्या भागास इजा पोहचत असल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे रब्बीची पिके वाचिवण्यासाठी शेतकर्यांना पिकांवर दिवसाआड औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे..................................यंदा विहिरी कुपनलिका व बोअरवेल्सला मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी वर्गाने मोठया प्रमाणात रांगडा कांदा,उन्हाळ कांदा,गहू,हरभरा ,ज्वारी, या रब्बी पिकांची शेतात लागवड केली आहे.मात्र वातावरणातील या बदलामुळे गहू व कांदा पिकावर मावा तसेच अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा तालुक्यात कांदा लागवड क्षेत्रात तिप्पट वाढ झाली असून अजूनही लागवड सुरूच असल्याने क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.तसेच गव्हाची सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.तसेच हरभरा पिकावर घाट अळीच्या प्रादुर्भावामुळे हि पिके धोक्यात आली असल्याने पिके वाया जातात कि आशी धास्ती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.........................................खरीप हंगामात शेतकरी वर्ग पूर्णपणे कर्ज बाजरी झालेला असून रब्बी हंगामही या निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक