आर. आर. पाटील यांच्या अस्थिंचे नाशकात विसर्जन
By Admin | Updated: February 21, 2015 01:32 IST2015-02-21T01:30:29+5:302015-02-21T01:32:54+5:30
आर. आर. पाटील यांच्या अस्थिंचे नाशकात विसर्जन

आर. आर. पाटील यांच्या अस्थिंचे नाशकात विसर्जन
नाशिक : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अस्थिंचे शुक्रवारी नाशिकमध्ये रामकुंडात विधीवत विसर्जन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता. पाटील यांच्या निधनामुळे शुक्रवारी दुपारी सर्वपक्षीय शोकसभेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नाशिकमध्ये रामकुंडावर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत अस्थिंचे पूजन करण्यात आले. आमदार पंकज भुजबळ यांनी विधीत सहभाग घेतला. त्यानंतर अस्थि विसर्जन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार छगन भुजबळ, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर अशोक मुर्तडक, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार देवीदास पिंगळे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.