शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 13:03 IST

बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे बँकेत गर्दी होऊ दिली जात नसल्याने शहरातील विविध बँकांसमोर लांब लांब रांगा दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी खात्यातील जमा पुंजी काढण्याकडे कल

नाशिक : शहरातील विविध खासगी व सार्वजिनिक क्षेत्रातील बँकांसमोरग्राहकांच्या रांगा कायम असून अनेक ग्राहकांकडून कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी आपल्या खात्यावरील जमा पुंजी काढण्याकडे कल दिसून येत आहेत. बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे बँकेत गर्दी होऊ दिली जात नसल्याने शहरातील विविध बँकांसमोर लांब लांब रांगा दिसून येत आहे. नाशिक शहरात लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिलता मिळत असताना नागरिकांच्या गरजाही वाढल्या असून वैयक्तीक  व कौटुंबिक गरजेच्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजणांकडून सुरक्षित भविष्यासाठी जमविलेल्या जमा पुंजी अर्थात मूदत ठेवी मोडून गरजा भागविण्याचा प्रयत्न होत आहे. काही ग्राहक याच मुदत ठेवी तारण ठेवून त्यावर अल्प कर्ज मिळविण्यासाठी बँकांमध्ये येत आहेत. त्यांच्यासोबतच जनधन खात्यावर दरमहा जमा होणारे पाचशे रुपये काढण्यासाठी येणाऱ्या महिला ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने बँकांबाहेर ग्राहकांच्या रांगा दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अजूनही अनेक नागरिकांना एटीएम अथवा डेबीट कार्डचा वापर करता येत नाही. तसेच मोबाईल अ‍ॅपही वापरता येत नाही असे ग्राहकही बँकेत पैसे काढण्यासाठी येत असल्याने बँकांसमोर ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिकbankबँकconsumerग्राहक