शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:59 IST

सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपुष्टात आली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार असून आता पक्षीय उमेदवार निश्चितीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान खासदारांबद्दल पक्षांतर्गत असलेला विरोध लक्षात घेता नव्या चेहऱ्याला संधी मिळते की, विरोध शमविण्यात दोन्ही पक्षांना यश लाभते, याची उत्सुकता आता लागून आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचे बिगुल वाजले आता लक्ष पक्षीय उमेदवारांच्या निश्चितीकडे, सर्वच पक्षांत रस्सीखेच

नाशिक : सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपुष्टात आली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार असून आता पक्षीय उमेदवार निश्चितीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान खासदारांबद्दल पक्षांतर्गत असलेला विरोध लक्षात घेता नव्या चेहऱ्याला संधी मिळते की, विरोध शमविण्यात दोन्ही पक्षांना यश लाभते, याची उत्सुकता आता लागून आहे.भारतीय निवडणूक आयोगाने १७व्या लोकसभेसाठी रविवारी (दि.१०) निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आणि लगोलग आचारसंहिताही लागू झाली. निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पक्षीय उमेदवारांच्या निश्चितीबाबत उत्सुकता वाढली आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत मोठा विरोध आहे. नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्याविरोधात पक्षातूनच काही इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. त्यातच एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा दुसऱ्यांदा निवडून येत नसल्याची परंपरा नाशिक मतदारसंघाची असल्याने आणि गोडसे यांच्या एकूणच पाच वर्षांतील कामगिरीबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्याने त्यांच्याविरुद्ध विरोधाची धार तीव्र होत चालली आहे. अशा परिस्थितीत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत मातोश्रीवर नेमका काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय, नाशिकची जागा शिवसेनेकडे असल्याने ती भाजपाला मिळावी यासाठीही काही इच्छुक पाण्यात देव बुडवून बसले आहेत.नाशिकप्रमाणेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळणार काय, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. भाजपाने पक्षांतर्गत केलेल्या सर्व्हेनुसार चव्हाण यांच्याविरोधात प्रतिकूल वातावरण असल्याचे समोर आल्याने पक्षात अन्य इच्छुकांच्याही अपेक्षा दुणावल्या आहेत. युतीमध्ये दोन्ही खासदारांबाबत विरोधाचे वातावरण असताना विरोधी पक्षातही उमेदवारीसाठी रस्सीखेच वाढली आहे. प्रामुख्याने, दिंडोरी मतदारसंघात राष्टÑवादीत चुरस दिसून येत आहे. त्यातच, कॉँग्रेस आघाडीत सहभागी होण्यासाठी माकपाने दिंडोरीच्या जागेचा आग्रह धरल्याच्या चर्चेने राष्टÑवादी पेचात सापडली आहे. मागील वेळी लढलेले बसपा, आम आदमी पार्टीची अद्याप भूमिका समोर आलेली नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादीकडून भुजबळ कुटुंबीयातील कोण, याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे. तर मागील निवडणुकीत ६ टक्के मते घेणाºया मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे.पन्नास दिवस राजकीय घडामोडींचेसन २०१४ मध्ये नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २४ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यावेळी दिंडोरी मतदारसंघात १० उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर नाशिक मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दिंडोरी मतदारसंघात १७५० मतदान केंद्र, तर नाशिक मतदारसंघात १६६४ मतदान केंद्र होती. आता सतराव्या लोकसभेसाठी दोन्ही मतदारसंघात एकाच वेळी २९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. आता पुढील ५० दिवसांत जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण