शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

लीज लॅन्डचा प्रश्न लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:45 IST

रक्षा संपदा विभागाच्या नव्या निर्णयानुसार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळालीच्या १३५ पैकी १३३ लीज लँडच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, यातील दोन प्रकरणांवर बोर्डात चर्चा करण्यात आली.

देवळाली कॅम्प : रक्षा संपदा विभागाच्या नव्या निर्णयानुसार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळालीच्या १३५ पैकी १३३ लीज लँडच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, यातील दोन प्रकरणांवर बोर्डात चर्चा करण्यात आली. भविष्यात या नव्या निर्णयाने जागा फ्री होल्ड करणाऱ्या नागरिकांसाठीदेखील आशादायक निर्णय घेण्यात येणार असल्याने देवळालीकरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेला तणाव दूर होणार आहे.  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत रक्षा मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डातील लीज, फ्री होल्ड केसेसबाबत निर्णय घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या या बैठकीत देवळालीतील १३५ भाडेपट्टा करारातील १३३ केसेस मार्गी लागल्या असून उर्वरित वॉर्ड क्र.१ मधील एक, तर वॉर्ड क्र.२ मधील एक अशा दोनच केस प्रलंबित असून सर्वच नगरसेवकांनी याबाबत या दोन्ही केसेस सदर बाजार भागातील असल्याने त्यांचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांनाही न्याय कसा देता येईल याची मागणी केली. बैठकीत शहराच्या क्रीडा संकुल व व्यापारी संकुलासाठी आवश्यक असणाºया निधीची लवकरात लवकर उपलब्धता, डिसेंबर महिन्यात सदर्न कमांड विभागातील होणाºया कल्चरल मीटसाठी होणाºया खर्चाबाबत चर्चा करण्याबरोबर विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.तत्पूर्वी बैठकीत बोर्डाच्या उपाध्यक्षा मीना करंजकर यांच्या सासूबाई, माजी उपाध्यक्ष सुनंदा कदम यांच्या सासूबाई यांचे निधन झाल्याने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बैठकीस बाबूराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, अ‍ॅडम कमांडंट राहुल मिश्रा, कर्नल कमलेश चव्हाण, गेरीसन इंजिनियर कर्नल कमलेश चव्हाण, सीईओ अजयकुमार आदी उपस्थित होते.स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाला आदेशबैठक संपताच ब्रिगेडियर पी. रमेश यांसह लष्करी सदस्य व नगरसेवक भगवान कटारिया यांनी शहरातील विविध समस्यांची पाहणी करीत पार्किंग, अतिक्रमण या स्वच्छतेबाबत योग्य ते निर्देश विविध विभागप्रमुखांना दिले. यामध्ये मुल्ला कॉम्प्लेक्स परिसरातील सार्वजनिक मुतारी तातडीने स्वच्छ करण्याबाबत आरोग्य विभागाला आदेश देत त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक